Lok Sabha Election 2024 । अरविंद केजरीवाल तिहारमधून बाहेर पडताच ‘वातावरण’ तयार करण्यासाठी निघाले आहेत. अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर जामिनावर बाहेर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जनतेसोबत संवाद साधला आहे. तसेच ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून कार्यकर्त्यांची आणि लोकांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री आज सकाळी 11 वाजता कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन आल्यानंतर दुपारी 1 वाजता कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी भारत माता की जय… इन्कलाब जिंदाबादचा नारा देत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, “मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो… आता मी देशभर फिरणार आहे. माझं तर मन धन देशासाठी कुरबान आहे… माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी अर्पण करणार आहे. माझ्या शरिरातील रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी मी देणार आहे. दिवसात 24 तास असतात. पण मी मी 36 तास काम करेन..’ असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला विचारतात की तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? पण मी त्यांना विचारतो, तुमच्याकडे कोण आहे? भाजपमध्ये 75 वर्षानंतर निवृत्ती घेतली आहे… लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केलं. पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत. मग भाजपला मी विचारतो प्रधानमंत्री पदाचा दावेदार कोण आहे? जर यांच सरकार आलं तर योगीना डावलून अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल. अमित शाह मोदींची गॅरंटी पूर्ण करणार का?, असं सवाल केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल पहिल्यांदाच करणार रोड शो…. पत्रकार परिषद झाल्यानंतर आज लोकसभा निवडणुकीत केजरीवाल पहिल्यांदाच रोड शो करणार आहेत. केजरीवाल दक्षिण दिल्लीतील पक्षाचे उमेदवार सहिराम पहेलवान यांच्या बाजूने मेहरौली येथे रोड शो करणार आहेत, ज्यामध्ये आपच्या सर्व बड्या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. पक्ष नवी रणनीती बनवेल… केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने आप आपली निवडणूक रणनीती बदलू शकते. पक्षाने केजरीवालांचे कौतुक करणारे ‘बंद में है दम’ हे गाणेही प्रसिद्ध केले. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने वृत्तवाहिनीला सांगितले की, पक्ष केजरीवाल यांचा चेहरा बनवून ‘जेलला उत्तर मताने’ मोहिमेला चिकटून राहील. अरविंद केजरीवाल हे व्यापारी, महिला, गावांशी संबंधित टाऊन हॉलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्याची योजना पक्षाने आधी केली होती. प्रचारात केजरीवाल यांचे चित्र अजूनही वापरण्यात येत असून मुख्यमंत्र्यांसोबत पुढील रणनीती आखली जाईल.