Arun Govil on Mosques। लोकसभेत शून्य प्रहरात, मेरठचे भाजप खासदार अरुण गोविल यांनी मशिदी आणि मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली. त्यांनी,”ही मोठी सार्वजनिक आणि सामुदायिक जागा आहेत जिथे सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट करताना, त्यांचे विधान कोणत्याही धर्मावर टीका करण्यासाठी नाही, तर देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी होते” असे म्हटले. अरुण गोविल यांनी याविषयी बोलताना,”देशभरातील मंदिरे, चर्च, गुरुद्वारा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा आणि बहुतेक सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे पारदर्शकता, सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रण सुनिश्चित करण्यात खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे” असेही त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, मशिदी आणि मदरशांमध्ये ही प्रणाली अद्याप लागू केलेली नाही, जरी ही मोठी सार्वजनिक ठिकाणे आहेत त्याठिकाणी दररोज मोठ्या संख्येने लोक भेट देतात, ज्यामुळे सुरक्षा तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले. Arun Govil on Mosques। मक्का, सौदी अरेबिया आणि मदरशांमध्ये देखील कॅमेरे पुढे बोलताना गोविल यांनी “इस्लामचे जन्मस्थान असलेल्या सौदी अरेबियातील मक्का आणि मदरशांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जर सुरक्षेला प्राधान्य देऊन तेथे ही व्यवस्था स्वीकारता येते, तर भारतातही अशाच प्रकारची सुरक्षा मानके लागू करण्यास संकोच का केला जातो? त्यांनी यावर भर दिला की जर मक्कासारख्या पवित्र स्थळावर सुरक्षा ही सर्वोतोपरी असेल, तर भारतातही हेच तत्व स्वीकारले पाहिजे” अशीही मागणी त्यांनी केली. सरकारला एकसमान राष्ट्रीय सुरक्षा धोरणासाठी आवाहन Arun Govil on Mosques। अरुण गोविल यांनी केंद्र सरकारला एकसमान राष्ट्रीय सुरक्षा धोरण तयार करण्याचे आवाहन केले, ज्या अंतर्गत मंदिरे, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जसे कॅमेरे अनिवार्य केले गेले आहेत. तसेच मशिदी आणि मदरशांमध्येही कॅमेरे अनिवार्य केले जावेत. ते म्हणाले, “यामुळे आपली राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होईल.” गोविल यांच्या विधानानंतर, सुरक्षा मानकांवरील चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. अनेकजण ते एकसमान सुरक्षा धोरणाच्या दिशेने एक आवश्यक पाऊल मानतात, तर काहीजण ते वादग्रस्त मुद्दा म्हणत आहेत. मात्र, गोविल त्यांच्या विधानावर ठाम आहेत, ते म्हणाले कि, “सुरक्षा ही सर्वांसाठी आहे आणि कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये”