RCB Victory Parade : बाहेर लोकांचा मृत्यू, आत आरसीबीचा विजयोत्सव…IPL च्या अध्यक्षांनी उपस्थित केले सवाल

RCB Victory Parade Celebration Turns Tragic : बुधवारी आरसीबीच्या आयपीएल २०२५ च्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमले होते. परंतु, स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. आरसीबी संघ स्टेडियमवर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थितीवर काबू मिळवण्यासाठी हलक्या प्रमाणात बळाचा वापर केला.
यानंतर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये पोलीस जखमी आणि बेशुद्ध झालेल्या लोकांना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयांमध्ये नेताना दिसले. या दुर्घटनेनंतर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल यांनी सांगितले की, आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमच्या आत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना बाहेरील परिस्थितीची माहिती नव्हती. त्यांना ही घटना प्रसारमाध्यमांमधील लोकांमार्फत समजली, त्यानंतर त्यांनी आयोजकांना फोन करून कार्यक्रम बंद करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ११ जणांच्या मृत्यूची केली पुष्टी –
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरसीबीच्या विजयाच्या उत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. धुमल यांना जाणून घ्यायचे होते की बंगळुरूमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले, कारण हा समारंभ मंगळवारी अहमदाबादमध्ये आधीच पार पडला होता आणि बीसीसीआयसाठी आयपीएल २०२५ चा हंगाम मंगळवारीच संपला होता.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल काय म्हणाले?
IPL chairman Arun Dhumal slammed RCB management and said ‘No one even informed us about these prades and Celebration’ ❌
.
.
📸 : JioHotstar
. #IPLFinals #ipl2025 #iplchairman #arundhumal #RCB #iplupdates #iplnews #injured #Death #explorecricket #explorepage #CricketNews… pic.twitter.com/JEIRbWPOlw— Cricket Gyan (@cricketgyann) June 4, 2025
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल यांनी सांगितले, “जेव्हा आम्हाला या दुर्घटनेची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही व्यवस्थापनाशी संपर्क साधला आणि त्यांनी समारोह लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ही घटना निश्चितच दुखद आणि वेदनादायी आहे. स्टेडियमच्या आत असलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर घडलेल्या घटनेची कोणतीही माहिती नव्हती.
हेही वाचा – RCB Victory Parade : आरसीबीच्या विजयाला दु:खाची झालर! चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू, ४० जखमी
या प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक –
अरुण धूमल यांनी पुढे स्पष्ट केले की, “आम्हाला हेही माहीत नाही की या कार्यक्रमाचे कोणी नियोजन केले होते. तसेच स्टेडियमबाहेर एवढी मोठी गर्दी कशी जमली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी संबंधित अधिकारी कारवाई करतील. हा बीसीसीआयचा कार्यक्रम नव्हता. ही घटना अत्यंत दुखद आहे.”





