हास्यजत्रेतील कलाकार ‘प्रेमाचा गुलकंद’ गाण्यावर थिरकले; न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ दाखवला जलवा

Gulkand Song Video | मागील काही दिवसांपासून ‘गुलकंद’ चित्रपट चर्चेत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटातील गाण्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नुकताच समीर चौघुलेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकार ‘प्रेमाचा गुलकंद’ गाण्यावर जबरदस्त डान्स करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारांनी ‘प्रेमाचा गुलकंद’ गाण्यावर डान्स न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरजवळ केला आहे. या व्हिडीओला त्यांने हटके कॅप्शन देखील लिहिलं आहे. Gulkand Song Video |
View this post on Instagram
कॅप्शनमध्ये लिहिलं की, “प्रेमाचं गुलकंद with MHJ फॅमिली at Times Square…आता 1 मे ला गुलकंद बघायला सहकुटुंब यायचं आणि खळखळून हसायचं…” त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा, कौतुकाचा आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, ‘गुलकंद’ हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ ट्रेलरमध्ये दिसून येतो. हा सिनेमा 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. Gulkand Song Video |
या चित्रपटात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. Gulkand Song Video |
हेही वाचा:





