Marathi cinema : १ मे २०२५ रोजी गुलकंद आणि आता थांबायचं नाय हे दोन चित्रपट रिलीज झाले. याच काळात बॅालीवूडचे अनेक मोठे चित्रपट देखील रिलीज झाले होते. तरीसुद्धा या दोन मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिवाय हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊनही दोघांनाही चांगला प्रेक्षकवर्ग लाभल्याची आकडेवारी सांगते. परिणामी गुलकंद आणि आता थांबायचं नाही चित्रपटांनी बॅाक्स अॅाफिसरवर बकळ कमाई करत नवा इतिहास रचला आहे. गेल्या ९ दिवसांत आता थांबायचं नाय या चित्रपटाने २ कोटींच्यावर बॅाक्स अॅाफिसवर कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४५ लाखंची कलेक्शन केले. तर गुलकंद चित्रपटाने ३ कोटींची भरगच्च कमाई केली आहे. या चित्रपटाला ओपनिंग डेला ५५ लाखांची कमाई करता आली. तर दुसऱ्या दिवशी काही अंशी कमाईत घट झाली होती. या दिवशी २५ लाखांची कमाई या चित्रपटाने केली होती. तिसऱ्या दिवशी ४२ लाख तर चौथ्या दिवशी ५७ लाख रुपयांची कमाई करण्यात चित्रपटला यश आले आहे. तसेच गेल्या नऊ दिवसांमध्ये आता थांबायचं नाय चित्रपटाला देखील प्रेक्षकवर्ग खेचण्यात यश आले आहे. चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाईचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत. दिवस पहिला-४५ लाख, दुसरा दिवस- १४ लाख, तिसरा दिवस -१७ लाख, चौथा लाख-४ लाख, पाचवा दिवस-१६ लाख, सहावा दिवस-१२ लाख, सातवा दिवस-१३ लाख, आठवा दिवस-१६ लाख, नववा दिवस-१४ लाख कमाई केली आहे.