सई ताम्हणकर आणि समीर चौघुलेची जोडी पहिल्यांदाच करणार एकत्र काम

Sameer Chaughule and Saie Tamhanakar | अभिनेत्री सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांची जोडी एका नव्या चित्रपटामुळे पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गुलकंद’ या चित्रपटात दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे.
सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात सईसोबत काम करण्याच्या अनुभवावर समीर चौघुले म्हणाला, “सई आणि माझी ओळख ‘फू बाई फू’ पासूनची आहे. त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो. आता ‘गुलकंद’च्या निमित्ताने तिच्यासोबत काम करण्याचा योग आला. यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्यासोबत काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केले. सईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ती एक चांगली सह-कलाकार आणि मैत्रीण आहे.” Sameer Chaughule and Saie Tamhanakar |
View this post on Instagram
सई ताम्हणकर म्हणाली की, “हास्यजत्रेत समीरला समोर परफॉर्म करताना पाहाणे आणि त्याच्यावर टिप्पणी करणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. कारण त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही. तो एक अप्रतिम अभिनेता आहेच आणि माणूस म्हणूनही तो तितकाच उत्कृष्ट आहे. सहकलाकार म्हणूनही त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल.”दरम्यान, सई आणि समीरला एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. गुलकंद हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





