Hapus Mango : हापूस आंब्याची आवक वाढली! तब्बल 1 लाख पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल

नवी मुंबई : Hapus Mango, हापूस आंबा, एपीएमसी मार्केट, APMC Market, आहेत. 80 हजार हापूस आंब्याच्या पेट्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यातून आल्या आहेत. तर उर्वरीत 20 हजार पेट्या परराज्यातून आल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ राज्यांचा समावेश आहे.
कर्नाटकचा हापूस 60 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे. कोकणातील हापूस आंब्याला 1500 ते 3500 रुपयांचा दर हा चार डझनाच्या पेटीला मिळत आहे. मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हापूस आंब्याचा सिझन चांगला असल्याने खवय्यांनी याच काळात आंबा खरेदी करावे असे आवाहन व्यापारी वर्गाने केले आहे. हापूस आंब्या बरोबर तोतापुरी, बदामी या जातीचे आंबे सुध्दा बाजारात येवू लागले आहेत.
चालू एप्रिल महिन्यापासून हापूस आंब्याचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू होतो. सध्या हापूस आंब्याच्या एका पेटीला जवळपास 3 हजार ते 4 हजार रुपयांपर्यंतचा बाजार भाव मिळतोय. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात येत असतो. मात्र, यंदा 1 एप्रिल ते 10 मे पर्यंत मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात उपलब्ध झाला आहे. त्यामुळं या एप्रिल महिन्यापासून आंबा प्रेमींना आंबा खाण्यासाठी एक पर्वणीच मिळाली आहे. तसंच, कमी दरात आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. अशातच मे महिन्यात आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होणार दर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.





