Pune District : हापूस आंबा भिगवणमध्ये दाखल

भिगवण : हापूस हा भारतातील आंब्याचा सर्वात खास प्रकार आहे. हा आंबा इतर जातींपेक्षा गोडपणा, सुगंध आणि चवीत उत्कृष्ठ आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रसिद्ध असणारा हा हापूस आंबा अखेर भिगवणमध्ये दाखल झाला आहे. त्या आगमनाप्रित्यर्थ आंबा पेटी पूजनाचा कार्यक्रम ज्योती समूहाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर पवार व दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.
ग्रामीण भागामध्ये सर्वात प्रथम भिगवण येथील हापूस आंबा व्यवसायिक संतोष सोनवणे यांच्या आंबा स्टॉलवर हापूस आंबा दाखल झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी एक महिना उशिरा हापूस आंब्याचा हंगाम लांबला आहे. त्यामुळे आंबा प्रेमींचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाल्याचे मागील काही दिवसांमध्ये पहावयास मिळत होते. कोकणातील रत्नागिरी (गणपतीपुळे) येथील आंबा बागायतदार विद्याधर पुसाळकर यांनी खूप मेहनतीने नैसर्गिक आपत्तीला तोंड देत सेंद्रिय पद्धतीचा दर्जेदार हापूस आंबा भिगवण व भिगवन पंचक्रोशीतील हापूस प्रेमींसाठी उपलब्ध करून दिला आहे.
चालू वर्षाचा हापूस आंब्याचा हंगाम हा फक्त दोन महिन्याचा असणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले तसेच हापूस आंब्याला दरही चांगल्या प्रमाणात राहणार असून. हापूस आंब्याची पेटी चंद्रशेखर पवार, दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ, सुरेश पिसाळ, विजयसिंह यांनी प्रत्येकी 13000/- रुपयांना खरेदी केली.
या पेटी पूजन समारंभास चंद्रशेखर पवार, रामदास झोळ, सुरेश पिसाळ, बापूराव थोरात, अशोकराव शिंदे, तुषार क्षीरसागर, आकाश पवार, संपतराव बंडगर, सचिन बोगावत, संदीप वाकसे, दादासाहेब थोरात, नितीन चितळकर, केशव भापकर, शरद चितारे, आप्पासाहेब गायकवाड, योगेश चव्हाण, प्रवीण वाघ, रियाज शेख, जावेद शेख, सतीश वायसे, अल्ताफ शेख, विजय सिंग, उमेश थोपटे, सागर जगदाळे, सागर घरत, निलेश मोरे, चैतन्य बंडगर, ओम बंडगर, अक्षय एकाड, सागर सोनवणे, रोहन देशमुख, शंकर जाधव, व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत चवरे यांनी केले.





