#व्हिडिओ : ‘आरे’त आंदोलकांवर पोलिसांची भाईगिरी
Updated On:

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी 2,238 झाडे अखेर काल रात्री कापण्यात सुरुवात झाली आहे. मात्र, रात्रीच्या अंधारात झाडं कपण्याचा हा प्रकार फार काळ लपू शकला नाही. आणि याविरोधात नागरिकांनी व पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणात ‘आरे वाचावा’ आंदोलनास सुरुवात केली आहे.
दरम्यान, काल रात्री पासून याठिकाणी पोलीस आंदोलकांची धरपकड करत असून परिसरात 144 कलम लागू केला आहे. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.





