“हजारो कोटी घोटाळा करणाऱ्यांचे अटक वॉरंट कॅन्सल होतं, मग…”; मनोज जरांगेंची आक्रमक प्रतिक्रिया

Manoj Jarange| मनोज जरांगे यांच्याविरोधात 2013 मधील एका प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाट्यनिर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणानंतर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार असल्याचे यावेळी जरांगेंनी म्हंटले आहे.
‘छत्रपतींचं महानाट्य दाखवलं हा गुन्हा केला का?’ Manoj Jarange|
“आम्ही जे केले ते प्रमाणिकपणे जनजागृतीसाठी केलं, कारण तो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जाण्यासाठी देखील तयार आहे. हजारो कोटी घोटाळा करणाऱ्यांचे अटक वॉरंट कॅन्सल होते. मग मी छत्रपतींचं महानाट्य दाखवलं हा गुन्हा केला का?”असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? Manoj Jarange|
जालन्यात 2013 मध्ये शंभूराजे या नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक प्रयोगाचे पाच लाख, असे सहा प्रयोगांसाठी तीस लाख रुपये देणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले होते. पण या प्रयोगांचे पूर्ण पैसे नाट्यनिर्मात्यांना देण्यात आले नसल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे यांना दोनदा समन्स बजावले होते. त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते. मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने जरांगे यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. Manoj Jarange|
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित
दुसरीकडे, मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याचे सांगितले आहे. मनोज जरांगे यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा :





