Arjun munda : अर्जुन मुंडा बनले भारताचे नवे कृषीमंत्री ; नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

Arjun munda : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा (Arjun munda) यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, अर्जुन मुंडा हे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मे 2019 मध्ये त्यांची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिपरिषदेचा राजीनामा स्वीकारला.
मध्य प्रदेशातील दिमानी विधानसभा मतदारसंघात ७९,१३७ मते मिळवून नरेंद्र तोमर यांनी राजीनामा दिला. राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे आणि भारती प्रवीण पवार यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून जलशक्ती मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. भाजपने नुकतेच राज्य विधानसभेत निवडून आलेल्या सर्व 12 खासदारांनी संसदेचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर केंद्रीय मंत्री तोमर, पटेल आणि सरुता यांनी राजीनामा दिला होता.




