Parth Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग? पार्थ पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला…
Parth Pawar: शरद पवार यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते सिल्व्हर ओक या निवासस्थानी

Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात येणार का? याबाबत जोरदार चर्चा सुरू असतानाच पार्थ पवार आज पुन्हा एकदा ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.
शरद पवार यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर, शरद पवार त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले आहे. त्यानंतर पार्थ पवार हे शनिवारी ‘सिल्व्हर ओक’वर गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार सिल्व्हर ओकवर आले त्यावेळी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरू होती. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. तब्बल दीड तास पवारांची भेट घेतल्यावर पार्थ पवार निघाल्याची माहिती समोर आली.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी विलीनीकरणाबद्दल मौन बाळगले आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार आता दुसऱ्यादिवशीही पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेल्याने विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा:




