Arjun Rajput Century : कोण आहे १९ वर्षीय अर्जुन राजपूत? ज्याने पाकिस्तानविरुद्ध ठोकले वादळी शतक, सेहवाग-द्रविडच्या लेकांची निराशा
Arjun Rajput Century : १९ वर्षीय अर्जुन राजपूतने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वादळी शतक झळकावत भारतीय संघाला ४६.३ षटकांत सर्वबाद २०८ धावापर्यंत पोहोचवले.

Arjun Rajput Century Against Pakistan U19 Asia Cup 2026 : अंडर-१९ आशिया कप २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात संकटात सापडलेल्या भारतीय संघासाठी युवा फलंदाज अर्जुन राजपूतने तारणहाराची भूमिका बजावली. अवघ्या २२ धावांवर ३ महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतर अर्जुनने पाकिस्तानी गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. प्रचंड दबावाखाली खेळताना त्याने अवघ्या ८० चेंडूंत वादळी शतक पूर्ण केले. ११ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने १०७ धावांची आक्रमक खेळी साकारत अर्जुनने भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
८० चेंडूंत शतक अन् १०७ धावांची वादळी खेळी –
भारतीय डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाल्यानंतर अर्जुनने मैदानात येत सूत्रे हाती घेतली. त्याने सुरुवातीला संयम राखत अवघ्या ४३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर गीअर बदलत त्याने अवघ्या ८० चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर अधिक आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो १०७ धावांवर रिझवानुल्लाहचा बळी ठरला. अर्जुन बाद झाल्यानंतर भारतीय डावाला पुन्हा एकदा गळती लागली; मात्र तोपर्यंत त्याने संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले होते.
A century against Pakistan under extreme pressure! India’s future batting leader, Arjun Rajput. 🇮🇳🔥 https://t.co/PvaFf6zYrE
— Mian Ahmad (@MianAhmad_56) November 8, 2026
छोले-कुलचे विकणाऱ्या आजोबांचा नातू बनला स्टार; असा आहे खडतर प्रवास
𝗛.𝗨.𝗡.𝗗.𝗥.𝗘.𝗗 💯
A clutch knock from Arjun Rajput, bringing up his century off 8️⃣0️⃣ deliveries 👏
Updates ▶️ https://t.co/WullKDGgH4
#MensU19AsiaCup https://t.co/bbCrgOxrZE
— BCCI (@BCCI) November 8, 2026
१९ वर्षीय अर्जुन राजपूत पंजाबच्या जालंधरचा रहिवासी आहे. त्याचे वडील होती राम आणि त्याचे आजोबा उदरनिर्वाहासाठी छोले-कुलचे विकायचे. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीशी लढा देत अर्जुनने हरभजन सिंग क्रिकेट अकादमीतून क्रिकेटचे धडे गिरवले. या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या कौशल्याच्या जोरावर पंजाब अंडर-१६ संघाचे कर्णधारपद भूषवले. विनू मंकड आणि कूचबिहार ट्रॉफीमध्ये केलेल्या धावांच्या जोरावर त्याने भारतीय अंडर-१९ संघात धडक मारली. उत्कृष्ट फलंदाजीसोबतच तो प्रभावी ऑफस्पिनरही आहे; त्याने मागील सामन्यात अवघ्या ८ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या.
सेहवाग-द्रविडच्या लेकांची निराशा; पाक गोलंदाजांचा मारा
Innings Break
Arjun Rajput’s hundred leads India U19’s batting effort!
Over to the bowlers now!
Scorecard ▶️ https://t.co/WullKDGgH4
#MensU19AsiaCup https://t.co/REp2HJti5R
— BCCI (@BCCI) November 8, 2026
या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी शून्यावर बाद झाला. क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असलेल्या आर्यवीर सेहवागने २२ धावा आणि अन्वय द्रविडने १० धावा केल्या; या दोघांनाही निकाब शफीकने बाद केले. याशिवाय व्ही. के. विनीत (८) आणि यशवर्धन चौहान (१) स्वस्तात तंबूत परतले. पाकिस्तानकडून निकाब शफीकव्यतिरिक्त अली रझा आणि रिझवानुल्लाह यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करत भारताला सुरुवातीला बॅकफूटवर ढकलले होते.





