अर्चना पूरण सिंगने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन

Archana Pooran Singh | अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या विनोदीशैलीमुळे तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय कपिल शोमध्ये देखील ती आपल्या हास्याने शोची रंगत वाढवते. मात्र सध्या अर्चना तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. अर्चना पती परमीत सेठीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता स्वत: अर्चनाने स्पष्टीकरण दिले आहे.
अर्चना यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून अर्चना यांच्या एका चाहत्याने परमीत आणि त्यांच्या नात्याबद्दल काळजी व्यक्त केली. त्यावर अर्चना म्हणाल्या, “आमचं भांडण एकदम नॉर्मल होतं. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करतो. त्यावर वाद करतो. पण त्यामुळे आमच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा तणाव नाही.”
अर्चना आणि परमीत यांनी ३० जून १९९२ रोजी पळून जाऊन लग्न केलं होतं. एका मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली होती. पुढे करिअरच्या भीतीने दोघांनी अनेक वर्ष त्यांचं लग्न इंडस्ट्रीपासून लपवून ठेवलं. परंतु नंतर परमीत आणि अर्चनाने लग्नाचा खुलासा केला. परमीत-अर्चना यांना दोन मुलं आहेत.
दोघांच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर अर्चना नुकतीच ‘नादानियां’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेत होते. याशिवाय ती नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसते. तर परमीत ‘अबीर गुलाल’ या चित्रपटात दिसणार होते, ज्यामध्ये फवाद खान आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. Archana Pooran Singh |
हेही वाचा:
Asad Qazi : वयाच्या सत्तरीतही जिद्दीने मिळविले यश; महाडचे असद काझी झाले दहावी परीक्षा उत्तीर्ण





