Eknath Shinde : “बाळासाहेबांनंतर पक्षात मनमानी कारभार, हम करे सो कायदा….”; शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
बाळासाहेबांची शिवसेना विचारधारेपासून दूर होवू शकत नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आहोत.

Eknath Shinde – शिवसेनेची बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांची घटना, बाळासाहेबांचे विचार नंतर कसे पायदळी तुडवले हे संपूर्ण राज्याने पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांची घटनाही बदलली, त्यांचे विचारही बदललेस सगळंच बदलले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले.
जनतेचे जमनत गोठवले. हिंदुत्वही गोठवले. आता धनुष्यबाणही गोठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने जो काही निर्णय घेतला तो आपल्याला माहिती आहे. जनता आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आहे.
त्यांना आम्हाला स्वीकारले आहे, त्यांनी आशीर्वादही दिले आहेत, असा शब्दांत शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दिल्ली दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत बाळासाहेबांच्या नंतर मनमानी होवू लागली होती, असा आरोप केला. तसेच, हम करे सो कायदा असे त्यांनी केलेले, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला आहे. परंतु, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्याबाबतच्या प्रश्नावर जास्त बोलणार नाही. बाळासाहेबांच्या नंतर मनमानी होवू लागली होती.
बाळासाहेबांची शिवसेना विचारधारेपासून दूर होवू शकत नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आहोत. जे संविधान धोक्यात असे गळा काढत आहेत, त्यांनी स्व:ताच्या पक्षात आत्मपरिक्षण केले पाहिजे.
बाळासाहेबांनी लोकशाही घडवली ती लोकशाही बुडवण्याचे काम ठाकरेंच्या शिवसेनेने केले आहे. हम करे सो कायदा असेही त्यांनी केलेले आहे. म्हणून ही परिस्थिती आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले.






