Shura Khan : अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. अरबाज खानची पत्नी शूरा खानने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यांच्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाबद्दल चाहते अरबाज आणि शूरा यांचे अभिनंदन करत आहेत. शूरा खानने आज ५ ऑक्टोबर रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. शूरा खानला ४ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर या जोडप्यांचे चाहते अभिंनदन करत आहेत. काल रात्री अरबाज खानने त्याची पत्नी शूराला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आणि आज तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अरबाज खान अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याशी विभक्त झाल्यानंतर २०२३ मध्ये त्याने शूरासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. नुकत्याच शूरा खानच्या बाळंतपणाच्या सोहळ्यात संपूर्ण खान कुटुंब नातेवाईकांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला कुटुंबाव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्संनी देखील सहभागी झाले होते. शूरा खानने बेबी शॉवरसाठी एक लांब पिवळा ड्रेस परिधान केला होता. या कार्यक्रमात शूरा तिच्या बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसली. शूरा खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आहे. अरबाज आणि शूरा यांची भेट ‘पाटणा शुक्ल’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे नाते तयार झाले आणि दोघांनी एकमेकांशी लग्न केले. हेही वाचा : अभिनेत्री सोहा अली खानने साजरा केला 47 वा वाढदिवस; सोशल मीडियावर खास फोटो केले शेअर