Sukhoi Aircraft : सुखोई विमानांसाठी २४० एरो इंजिन खरेदीला मान्यता

नवी दिल्ली – सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने आज हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० विमानांसाठी २६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाची २४० एरो-इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या एरो-इंजिनचा पुरवठा एक वर्षानंतर सुरू होईल आणि आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल.
एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे इंजिनांमध्ये 5५४ टक्क्यांहून जास्त स्वदेशी सामग्री असेल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापुट विभागात या एरो-इंजिनचे उत्पादन केले जाईल.
सुखोई-३० हे भारतीय वायू दलाच्या सर्वात शक्तिशाली आणि सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या ताफ्यातील एक विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे या एरो-इंजिनांचा पुरवठा भारतीय वायू दलाला आपल्या मोहीमा विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकट करण्यासाठी या इंजिनांचा पुरवठा केला जाईल.





