ठाकरे गटाकडून समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर; लोकसभेच्या 18 जागा लढवणार?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजवू शकते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवीन समन्वयकांना संधी देण्यात आली आहे. राज्यातील या 48 पैकी 18 जागा शिवसेना ठाकरे गट लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर किशोर पोतदार, सुभाष म्हसकर यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम आणि माजी आमदार संजय कदम यांच्याकडे रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
लोकसभा समन्वयकांची नावे –
जालना : राजू पाटील
संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे
जळगाव : सुनील छबुलाल पाटील
बुलढाणा : राहुल चव्हाण
रामटेक : प्रकाश वाघ,
यवतमाळ : वाशीम – उद्धव कदम
हिंगोली : संजय कच्छवे
परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे
नाशिक : सुरेश राणे
रायगड : संजय कदम
मावळ : केसरीनाथ पाटील
धाराशीव : स्वप्नील कुंजीर
कोल्हापूर : सुनील वामन पाटील
ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर
मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस
मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी
मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर
मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून विविध भागात जाऊन पक्षाची ताकद वाढवत आहेत. तर आता लोकसभा समन्वयक नियुक्त जाहीर करत ठाकरे गटाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.





