Pune | ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती’च्या अध्यक्षपदी विठ्ठल विचारे यांची नियुक्ती

हडपसर – पुणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने हडपसर विधानसभा मतदार संघाच्या हवेली तालुक्यातील ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती’च्या शासकीय आणि अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून विठ्ठल गोपाळराव विचारे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. तर सदस्य म्हणून वामन बळीराम धाडवे, प्रतिमा प्रशांत तुपे, रमेश ज्ञानोबा राऊत, स्वाती आशिष चिटणीस, जान महमंद शेख, रवींद्र भानुदास सातभाई, राहुल ज्ञानेश्वर लोणकर, कलेश्वर अनंता घुले, दत्तात्रय रामदास शिंदे यांची यर शासकीय प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त अध्यक्ष विठ्ठल विचारे पाटील म्हणाले की समाजातील अनेक नागरिक वृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, अशा सर्व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना यांचा लाभार्थीना लाभ कसा करून देता येईल,यासाठी या कामाला आधिकाधिक प्राधान्य देऊन प्रयत्न केले जातील.





