कॉंग्रेस प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची नियुक्ती
Updated On:

पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच राज्यातील प्रवक्त्यांची नियुक्ती केली असून त्यात तिवारी यांना पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
गोपाळ तिवारी हे 10 वर्षं अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, हरीयाना या सारख्या विविध राज्यात कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती तसेच ते महापालिकेचे माजी नगरसेवक असून सध्या ते राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत.





