विराटचा सहकारी झाला ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक

मेलबर्न – जस्टिन लॅंगर यांनी करार वाढवण्यास नकार दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या अँड्य्रू मॅकडोनाल्ड यांनाच मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आले आहे. त्यांच्याशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने चार वर्षांचा करार केला आहे.
ऑस्ट्रेलियाने तब्बल दोन दशकांपेक्षाही जास्त कालावधीनंतर पाकिस्तानचा दौरा केला होता. यात कसोटी मालिका त्यांनी 1-0 अशी जिंकत इतिहास रचला होता. संघाच्या विजयात मॅकडोनाल्ड यांचे मोठे योगदान राहिले होते, त्यामुळे लॅंगर यांच्या मुदतीची अखेर झाल्यावर मॅकडोनाल्ड यांनाच मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, माजी अष्टपैलू खेळाडू असलेले मॅकडोनाल्ड आयपीएल आणि इंग्लिश काऊंटीमध्ये मुख्य प्रशिक्षक होते. कोचिंग करण्याआधी ते खेळाडू म्हणून आयपीएलही खेळले. 2010 साली त्यांनी 4 मॅच, 2011 ला 1 मॅच आणि 2012 ला 4 मॅच अशा एकूण 9 आयपीएल मॅच खेळल्या. या काळात ते दिल्ली डेयरडेव्हिल्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीच्या टीमचा भाग होते. 3 वर्षांमध्ये 9 मॅच खेळून 40 च्या सरासरीने त्यांनी 120 रन केले, यात नाबाद 33 रन त्यांचा सर्वाधिक स्कोअर होता.





