IND vs AUS 1st Test : कोरडया खेळपट्टीमुळे भारतीय फलंदाजांना मदत – अँड्र्यू मॅकडोनाल्ड

पर्थ – भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी स्पर्धेला सुरुवात झाली असून, भारताने पाहिल्या दिवशी सर्वबाद १५० धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलिया संघाचा डाव देखील पहिल्या दिवशी गडगडला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया संघाचे देखील ७ फलंदाज तंबूत परतले होते. पहिल्या दिवशी एकूण १७ फलंदाज बाद झाले. मात्र शनिवारी ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज बाद झाल्यानंतर भारताचा दुसऱ्या डावात एकही फलंदाज बाद झाला नाही. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कोणतीच चूक नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केले.
पर्थ येथील खेळपट्टी ही नेहमीच वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. या खेळपट्टीवर चेंडू उसळी मारतो. याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला. भारताचे १० व ऑस्ट्रेलियाचे ७ असे एकूण १७ फलंदाज पहिल्याच दिवशी बाद झाले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे राहिलेले ३ फलंदाज देखील बाद झाले. त्यानंतर भारताच्या सलामी वीरांनी एकहाती किल्ला लढविताना नाबाद १७२ धावांची भागीदारी केली.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात खेळपट्टीमध्ये ओलावा दिवस होता. त्यानंतर कडक ऊन पडले होते. त्यामुळे खेळपट्टीवर असलेला ओलावा संपला व खेळपट्टी कोरडी झाली. खेळपट्टी कोरडी झाल्याने ती फलंदाजाच्या दृष्टिकोनातून खेळण्यासाठी योग्य राहिली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असली तरी त्यांना भारताची सलामीची जोडी फोडण्यात अपयश आले.
दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मॅकडोनाल्ड म्हणाले, आज खेळपट्टी खूप लवकर कोरडी झाली. त्यामुळे खेळपट्टीवर असणारे गवत लवकर सुकले. आम्हाला वाटत होते, कि चेंडू जरा जास्त स्विंग करेल. मात्र आम्हाला दोन्ही सत्रामध्ये अपेक्षित असलेली सिम मुव्हमेंट किंवा स्विंग मिळालीच नाही. यामुळे आम्ही देखील आश्चर्यचकीत झालो आहोत. ते पुढे म्हणाले, आमचे गोलंदाज कालच्या प्रमाणेच सीम गोलंदाजी करत होते. त्यामुळे त्याची यामध्ये काही चूक आहे, असे आम्हाला वाटत नाही. गोलंदाजासाठी कालच्या तुलनेत आजचा दिवस जास्त कठीण होता. आजचा दिवस लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांनी चांगल्या प्रकारे खेळून काढला.
भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल (90 धावा) आणि केएल राहुल (62 धावा) यांनी 172 धावांची नाबाद भागीदारी करून यजमान संघाची निराशा केली, त्यामुळे पाहुण्या संघाने सामन्यावर पूर्ण ताबा मिळवला आणि आता 218 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवशी 17 फलंदाज बाद झाले होते, तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे फक्त तीन तळाचे फलंदाज बाद झाले.





