Nagar | विखे, जगताप, राजळे, लहामटे, कर्डिले यांच्यासह 34 उमेदवारांचे अर्ज दाखल

नगर, (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी गुरुपृष्यामृतच्या मुहूर्तावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, राणी लंके यांच्यासह 34 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, आत तिसर्या दिवशीही अर्ज नेण्याची संख्या कमी नव्हती. आजही 119 जणांनी 192 अर्ज नेले.
आज विधानसभा निवडणूक कार्यालयात चांगलीच गर्दी होती. शिर्डीतून भाजपतर्फे, राधाकृष्ण विखे, अकोलेतून अजितदादा गटाकडून आ. लहामटे, शेवगाव- पाथर्डीतून भाजपतर्फे आ. राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अॅड. प्रताप ढाकणे, जनशक्तीतर्फे हर्षदा काकडे,
राहुरीतून भाजपतर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नगर शहरातून अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप, पारनेरमधून शरद पवार गटातर्फे राणी लंके, श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत.
मतदार संघनिहाय उमेदवारांची संख्या (कंसात अर्जांची संख्या)- अकोले 20 (26), संगमनेर 26 (53), शिर्डी 27 (45), कोपरगाव 52 (74), श्रीरामपूर 52 (107), नेवासे 43 (83), शेवगाव 41 (83), राहुरी 44 (64), पारनेर 28 (54), अहमदनगर शहर 49 (97), श्रीगोंदे 49 (81), कर्जत-जामखेड 24 (44) एकूण 455 इच्छुकांनी 811 अर्ज घेतले आहेत.
मतदार संघनिहाय उमेदवार (कंसात दाखल अर्जांची संख्या)- अकोले 3 (3), संगमनेर 1 (1), शिर्डी 3 (4), कोपरगाव 2 (2), श्रीरामपूर 1 (4), नेवासे 0, शेवगाव 10 (13), राहुरी 5 (5), पारनेर 3 (3), अहमदनगर शहर 1 (1), श्रीगोंदे 4 (5), कर्जत-जामखेड 1 (1) एकूण 34 उमेदवारांनी 42 अर्ज दाखल केले आहेत.





