Raj Thackeray : वरळीतील डोम सभागृहात तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची दमदार एन्ट्री स्टेजवर झाली. यावेळी टाळ्या शिट्या अन् जल्लोष असे चित्र पाहायला मिळाले. या मोर्चातून सर्वप्रथम राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. दोघेही बंधू मराठी भाषेच्या मुद्यावर एकत्र आले आहेत. राज ठाकरेंनी सन्माननीय उद्धव ठाकरे अशी सुरुवात भाषणाला केली. राज ठाकरे यांनी भाषणातून मराठी भाषेला केंद्रस्थानी ठेऊन आपल्या ठाकरे बाण्यात सरकावर टीकास्त्र डागले. यावेळी राज ठाकरे यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर उद्धव ठाकरे आपल्या नेहमीच्या शैलीत सर्वसाधारण लूकमध्ये होते. मेळाव्याच्या स्थळी राज ठाकरे यांनी हजेरी लावल्यानंतर त्यांच्या खांद्यावर निळी मफलर टाकलेली होती. डोळ्यांवर गॉगल होता. पूर्वी राज ठाकरे भगवी शॉल वापरायचे, हळूहळू करडा रंग आणि राखाडी रंग वापरु लागले. आजच्या कार्यक्रमात त्यांनी थेट निळी मफलर खांद्यावर टाकल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीदेखील निळा शर्ट परिधान केलेला होता. अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं : राज ठाकरे आज मोर्चा निघायालाच पाहिजे होता. मोर्चामध्ये मराठीच्या एकतेचं चित्र दिसले असते. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपीठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असे विधान त्यांनी केले. हेही वाचा : खळखट्याक…! “मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा” चॅलेंज देणाऱ्या सुशील केडियाचं मुंबईतील अॅाफिस फोडलं