Eknath Shinde : जय गुजरात.! शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट; करून दिली आठवण, पाहा Video

Eknath Shinde | Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील कार्यक्रमातील भाषणावेळी ‘जय गुजरात..’ म्हटल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते आणि शिंदेंनी अमित शहांचे तोंड भरून काैतुक केले. भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात..” अशा घोषणा दिल्या.
अगोदर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हटले आणि त्यानंतर थांबले आणि मग जय गुजरात अशी घोषणा दिली. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर सडकून टिका केली. शिवसेना उबाठा गटाने आता बाळासाहेब ठाकरेंचे विचार कुठे गेले? म्हणत शिंदेंवर टिका केली आहे. दरम्यान, यानंतर आता शिवसेनेने (शिंदे गट) उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ दाखवला आहे.
शिंदे गटाने एक्सवर उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे ‘जय गुजरात’ म्हणत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सोबत ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ अशीही टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गुजरातमधील भाजपाच्या कार्यक्रमात गेले होते हा व्हिडीओ तेव्हाचा आहे.
एक तर हे भोंदू आहेत, नाही तर संधीसाधू! pic.twitter.com/mXEtLx25xK
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 4, 2025
मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली आहे.





