मनसेच्या दणक्यानंतर, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेकडून माफीनामा

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये गोकुळधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी भिडताना दिसले. यावेळी बापुजी ‘हिंदी ही मुंबईची मातृ भाषा’ आहे, असं म्हणतात. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख ‘अमेय खोपकर’ चांगलेच संतापले आणि ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jab Gokuldham wasiyon ne batayi Bapuji ko saari baat. Toh Bapuji ne sabhi ko samjha kar sambhal liye saare haalat! #TMKOC pic.twitter.com/3ttP7rirVA
— TMKOC (@TMKOC_NTF) March 1, 2020
अमेय खोपकर म्हणाले कि, “हेच ते मराठीचे मारक मेहता! मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काहीच चुकीच वाटत नाही, याचीच शरम वाटते” असं ते ट्विटमध्ये म्हणाले होते.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 3, 2020
दरम्यान, मनसेच्या या जोरदार दणक्या मुळे तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे जाहीर माफी मागितली आहे. तसेच, या मालिकेत चंपक चाचाच्या भूमिकेत असलेल्या अमित भटने सुद्धा लेखी माफी मागितली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 3, 2020
अमित भट म्हणाले, “मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. सदर मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारतो. या मालिकेत काम करत असताना लेखकाने दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असे माझ्याकडून चुकून बोलले गेले आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. तरीदेखील मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीशः दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल की विनंती…
मुंबई महाराष्ट्र में है और हमारे महाराष्ट्र की राजभाषा भाषा मराठी ही है. इस में कोई डाउट नहीं है. मैं भारतीय हूँ . महाराष्ट्रियन हूँ और गुजराती भी हूँ. सारी भारतीय भाषाओं का सम्मान करता हूँ. ???? जय हिन्द,
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) March 3, 2020





