काही होऊ शकते !!! ५०० रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो

Anupam Kher | गुजरातमधील अहमदाबादमध्ये ५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इतकेच नाही तर नोटेवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ऐवजी ‘रेसोल बँक ऑफ इंडिया’ असे लिहिले आहे. खुद्द अनुपम खेर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या छापील नोटचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. Anupam Kher |
हा व्हायरल व्हिडिओ पाहून बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर स्वतः थक्क झाले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “चला, यावर बोला! पाचशे रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? काहीही होऊ शकते!”
View this post on Instagram
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, सराफा व्यापारी मेहुल ठक्करकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सराफा व्यापाऱ्याने सांगितले की, 1 कोटी 60 लाख रुपये रोख स्वरूपात द्यायचे होते. एका व्यक्तीने आपली बॅग भरली. बॅग उघडली असता त्यात महात्मा गांधींच्या फोटोऐवजी अनुपम खेर यांच्या फोटोसह बनावट नोटा आढळल्या. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आता या नोटा कशा बनवल्या आणि त्यामागील सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. Anupam Kher |
अनुपम खेर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा ‘द सिग्नेचर’ चित्रपट 4 ऑक्टोबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. केसी बोकाडिया आणि विनोद एस चौधरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘इमर्जन्सी’ आणि ‘विजय 69’ चित्रपटात दिसणार आहे.





