चिंता वाढली.! भारतातील करोना रुग्णांचा आकडा तीन हजार पार; केंद्र सरकार सतर्क

नवी दिल्ली – शेजारच्या चीनमध्ये करोनाचा जो नवा अवतार अर्थात व्हेरियंट आढळला आहे, त्यामुळे जगात आणि भारतातही काहीसे काळजीचे वातावरण आहे. हा व्हेरियंट किती धोकादायक असेल याचा विचार आणि तपासणी केली जाते आहे. सध्या चीनमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. चीनमध्ये या 20 दिवसांमध्ये 24 कोटी 80 लाख लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. आणि त्यामुळेच आता भारतात देखील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, अद्याप तरी भारतात परिस्थिती दिलासादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. देशात आज 196 नवे रुग्ण आढळले असून मागील 24 तासांत एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. असं देखील आरोग्य विभाकडून सांगण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे तसेच बूस्टर डोस घेण्याचं आवाहन देखील केंद्र सरकार आणि आरोग्य विभाग करत आहे.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya will hold a meeting via video conferencing with the Indian Medical Association today on Covid19 situation and preparedness: Indian Medical Association
(IMA)— ANI (@ANI) December 26, 2022
मात्र, दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील देखील आता काही ठिकाणी नागरिकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.
देशात पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आवश्यक पाऊले उचलली जात आहेत. आरोग्य प्रशासनाकडून दिल्ली विमानतळावर 500 हून अधिक प्रवाशांची रँडम कोविड चाचणी घेण्यात आली. सरकारकडून RT-PCR चाचण्यांवर भर दिला जात आहे.





