अनुष्का शर्माने किंग कोहलीची केली मस्करी ! जन्मदिवसानिमित्त विराटाचे कधीही न पाहिलेले मजेदार फोटो केले पोस्ट

मुंबई – भारताचा आक्रमक बॅट्समन विराट कोहली आज आपला ३४ वा जन्मदिवस साजरा करतोय. अशात विराटवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना अभिनेत्री आणि विराटची पत्नी असलेल्या अनुष्का शर्माने त्याचे यापूर्वी कधीही न पाहिलेले फोटो पोस्ट करत आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर विराटाचे चार फोटो पोस्ट केले आहेत. ज्यातील पहिल्या फोटोत विराटचा क्लोज चेहरा दिसत आहे. कोहली फॅन्सला हा फोटो खूपच फनी वाटत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये विराट अगदी टुरिस्ट स्टाईलमध्ये आहे आणि त्याची स्माईल पाहण्यासारखी आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये अनुष्काने विराटच्या चेहऱ्याचा क्लोजअप फोटो टाकला आहे. तर शेवटच्या फोटोमध्ये विराट आपल्या बाळासोबत दिसत आहे. “आज तुझा जन्मदिवस आहे,म्हणून मी तुझे बेस्ट अँगल फोटो पोस्ट करत आहे” असं कॅप्शन देत अनुष्काने विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
अनुष्काने दिलेल्या शुभेच्छा अनेकांनी फनी वाटत आहेत. या फोटोंवर सोशल मिडीआयवर जोरदार कमेंटबाजी पाहायला मिळत आहे. अनेकांना अनुष्काने गमतीत केलेली ही मस्करी चांगलीच आवडताना दिसत आहे. विराटने देखील स्माईलच्या इमोजीने रिप्ले देत अनुष्काचे आभार मानले आहेत. मात्र यानिमित्ताने विराटाचे कधीही न पाहिलेले फोटो सर्वांना पाहायला मिळाले.





