भूषण प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अनुषाने दिल्या खास शुभेच्छा; नेटकरी म्हणाले ‘सुंदर जोडी…’

Bhushan Pradhan And Anusha Dandekar | मराठमोळा अभिनेता भूषण प्रधानने नुकताच त्याचा 38 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त चाहत्यांसह कलाकार मंडळींकडूंन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र अभिनेत्री अनुषा दांडेकरने तिच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर यांचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच भूषणच्या वाढदिवसानिमित्त अनुषाने खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री भूषणला शुभेच्छा देताना लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भुशी! येणारं प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी अविश्वसनीय आणि भरभराटीचं ठरो. तू खूप जास्त हुशार आहेस आणि आता तुझ्या हुशारीची झलक संपूर्ण जगाने पाहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला नेहमी आनंदी ठेवल्याबद्दल थँक्यू, मला छोट्या-छोट्या गोष्टी सरप्राइज म्हणून दिल्याबद्दल थँक्यू. तुझं मन खरंच खूप मोठं आहे. एक सच्चा माणूस, चांगला मुलगा, भाऊ, एक खूप छान मित्र आणि तुझ्यातल्या याच गोष्टी मला खूप आवडतात. तू सर्वांवर मनापासून प्रेम करतोस. Bhushan Pradhan And Anusha Dandekar |
View this post on Instagram
तुझं मन खूप सुंदर आहे, प्रेमळ व्यक्ती आहेस, चांगला मुलगा, भाऊ आणि मित्र आहेस आपले स्वभाव एकदम जुळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा स्वभाव खूप खरा आहे… हा खरेपणा कायम जपून ठेव. मी तुला फक्त वर्षभर ओळखतेय पण, आता हे वर्ष शंभर वर्षां इतकं वाटतंय, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना? लव्ह यू! भूषण प्रधान” Bhushan Pradhan And Anusha Dandekar |
अनुषाने या पोस्टबरोबर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी ‘लवकर लग्न करा’, ‘सुंदर जोडी’, ‘हे दोघंही डेट करत आहेत का?’ अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान, नुकतेच भूषण ‘जुनं फर्निचर’ आणि ‘घरत गणपती’ या चित्रपटात काम केले आहे. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात भुषणसह अनुषानेही काम केले आहे. Bhushan Pradhan And Anusha Dandekar |





