गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर भूषण प्रधानने आई-वडिलांसाठी खरेदी केलं नवं घर

Bhushan Pradhan New Home | अभिनेता भूषण प्रधानने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तो सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच त्याने गणेशाउत्सवानिमित्त आपल्या आई-वडिलांसाठी एक गिफ्ट घेतले आहे. भूषणने नवं घर खरेदी केलं असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
भूषणने त्याच्या सोशल मीडियावरुन नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत. पुण्यात भूषणने हे नवीन घर खरेदी केलं आहे. आई-वडिलांना भूषणने हे घर गिफ्ट म्हणून दिलं आहे. भूषणने पोस्ट करत लिहिलं की, “गेल्या ६ महिन्यांपासून मला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आहे. ‘जुनं फर्निचर’ आणि ‘घरत गणपती’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटामुळे पालकांचं वय वाढत असताना त्यांना एक सुरक्षित आयुष्य कसे द्यायचे याचा फार जवळून अनुभव घेता आला. आता स्वप्न पूर्ण झालं आहे.”
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, “गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर माझं स्वप्न पूर्ण झालंय. मी माझ्या पालकांसाठी नवीन घर घेतलं आहे. मला स्वप्न साकार करायला गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिले आहेत. ही एक आमची नवी सुरुवात आहे. गणपती बाप्पा मोरया!” असे म्हणत भूषणने आनंद व्यक्त केला आहे. भूषणच्या या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. Bhushan Pradhan New Home |
भूषणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘जुनं फर्निचर’ हे चित्रपट त्याने केले आहे. नुकताच त्याचा ‘घरत गणपती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. Bhushan Pradhan New Home |
हेही वाचा:





