अनुपम खेर म्हणाले,’मला आमिर खानला विचारायचे आहे की, ‘त्याने काश्मीर फाइल्स पहिला का ?’

मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अनुपम खेर नेहमीच चर्चेत असतात. अनुपम खेर प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडण्यासाठी ओळखला जातात. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
सध्या आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावर विरोध झाला. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकला नाही. अनेक स्टार्स आमिरच्या समर्थनार्थ उभे राहिले. आता नुकतेच अनुपम खेर यांनी बॉयकॉट लाल सिंग चड्ढावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी वृत्तमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘बहिष्काराच्या ट्रेंडची चर्चा सुरू आहे. असे ट्रेंड अनेकदा सोशल मीडियावर चालतात. एका चित्रपटाला अचानक इतकं महत्त्व का दिलं जातं? लोकांना तुमचा चित्रपट आवडला नाही असे तुम्ही का म्हणू शकत नाही? चित्रपट अयशस्वी होण्याची ही पहिलीच वेळ नाही.’
‘एक ट्रेंड चित्रपटाचा नाश करू शकतो यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आमिर खानने 2015 मध्ये असहिष्णुतेबद्दल विधान केले होते, ज्याची व्हिडिओ क्लिप ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी खूप व्हायरल झाली होती.’
अनुपम खेर यांना लाल सिंग चड्ढा कधी पाहणार असे विचारले असता, ते म्हणाले, “माझ्याकडे आता सध्या बघायला वेळ नाहीये.” मला पाहिजे तेव्हा बघेन, पण मला आमिर खानला विचारायचे आहे की त्याने काश्मीर फाइल्स पाहिल्या आहेत का?
अनुपम खेर यांनी शिमला येथील एका परिषदेत सांगितले की, ‘काही वर्षांपूर्वी लोकांना त्यांच्या चित्रपटांबद्दल काही वाद व्हावेत, असे वाटत होते कारण यामुळे त्यांचेचित्रपट चालतील. असा त्यांचे मत होते. मला वाटतं ‘लाल सिंग चड्ढा’ चांगला असता तर बहिष्कार टाकून काही फरक पडला नसता. चांगले चित्रपट त्यांचा मार्ग शोधतात. असेही होऊ शकते की लोकांना चित्रपट आवडला नाही. चित्रपट खरोखर चांगला नसेल.’ असंही ते म्हणाले.





