Antim Panghal : अंतिम पंघालवरील बंदीच्या वृत्ताचे IOA ने केले खंडन, स्वत: अंतिमनेही Video व्दारे दिले स्पष्टीकरण…

Antim Panghal & Indian Olympic Association : भारतीय कुस्तीपटू अंतीम पंघल गेल्या 24 तासांपासून सतत चर्चेत आहे. बहुतेक करून चुकीच्या कारणांसाठी…! पॅरिस ऑलिम्पिकच्या 53 किलो वजनी गटात तिला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर तिच्यावर ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये अनुशासनहीनतेचा आरोप करण्यात आला. तसेच तिला भारतात पाठवण्यात आल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) तिच्यावर तीन वर्षांची बंदी घालू शकते, असा दावाही काही माध्यमांनी केला आहे.
या सर्व घडामोडींमध्ये खुद्द अंतिम पंघालने एक व्हिडिओ जारी करून आपली बाजू मांडली आहे. याशिवाय ज्या वृत्तांमध्ये तिच्यावर बंदी घालण्याची चर्चा होती, ते वृत्तही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने निराधार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अंतिम पंघालवर बंदी घालण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे आयओएने म्हटले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना विनंती केली की, कृपया असे वृत्त पोस्ट करण्यापूर्वी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) नेतृत्वाशी संपर्क साधावा. दुसरीकडे, आयओएशी संबंधित एका सूत्राचा हवाला देत पीटीआयने म्हटले आहे की, आयओए या विषयावर विचारविनिमय करेल आणि येत्या काही दिवसांत औपचारिकपणे निर्णय जाहीर करेल.
जाणून घ्या, व्हिडिओमध्ये अंतिम पंघालनं काय म्हटल आहे..?
‘कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. मी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. मात्र माझा पराभव झाल्यापासून माझ्या बहिणीची चर्चा होत आहे. माझ्या बहिणीला पोलिसांनी अटक केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मला पकडले आहे. पण असे काहीही झाले नाही.
nnis Exclusive: ANTIM PANGHAL CLEARS THE AIR FROM PARIS!
➡️ On facing deportation for allegedly trying to ‘smuggle’ her sister into the Games Village.
➡️ Taken into police custody.
➡️ Her coach refused to pay the cab driver and misbehaved.
She asks everyone not to spread… pic.twitter.com/Nopxe8UDlC
— nnis Sports (@nnis_sports) August 8, 2024
काल सामन्यानंतर मला ताप आला होता. माझी बहीण हॉटेलमध्ये थांबली होती आणि तिला मला तिथे घेऊन जायचे होते. यानंतर माझी तब्येत बरी नसल्याबद्दल मी माझ्या प्रशिक्षकाची परवानगीही घेतली. नंतर परवानगी मिळाल्यानंतर मी बहिणीजवळ हॉटेलवर गेली. हॉटेलमध्ये आल्यावर मला काही सामानाची खूप गरज होती, जी मी क्रीडा गावात विसरले होते. माझी तब्येत खराब असल्याने मला झोप लागली. त्यानंतर माझी बहिणी माझे ॲक्रिडिटेशन कार्ड घेऊन क्रीडा गावात गेली.
माझ्या बहिणीने अंतिमचे सामान नेता येईल का, अशी विचारणाही तेथील अधिकाऱ्यांना केली. मात्र अधिकाऱ्यांनी तिच्याकडून माझे ॲक्रिडिटेशन कार्ड काढून घेत पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांनी कार्डची पडताळणी केली आणि पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी माझ्या बहिणीला ॲक्रिडिटेशन कार्ड दिल्यानंतर तिला परत पाठवले.
“माझ्या कोचचे कॅब चालकाशी भांडण झाल्याचे बोलले जात आहे. पण असे काही घडले नव्हते. सामना संपल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. त्यानंतर प्रशिक्षक क्रीडाग्राममध्येच थांबले होते. आम्ही त्यांच्यासाठी कॅब बुक केली होती. भाषेतील फरकामुळे थोडी अडचण आली कारण कॅब ड्रायव्हर म्हणत होता की आमच्याकडे पुरेसे युरो नाहीत. आम्ही पैसे घेण्यासाठी आलो तेव्हा थोडा वाद झाला. पण जेवढे पसरवले जात आहे तसे काहीही झाले नाही.”
Paris Olympics 2024 : विनेश तू एक खरी योद्धा आहेस – अभिनव बिंद्रा
‘त्या’ आरोपावर अंतिम म्हणते की…
“फायनल पंघालमध्ये शिस्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी तक्रार फ्रेंच अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली होती. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने निर्णय घेतला आहे की अंतिम स्पर्धक आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला भारतात परत पाठवले जाईल.” यावर अंतिम फोगटने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “जेव्हा माझा सामना संपला तेव्हा मीच फेडरेशनला काॅल केला होता की, मी भारतात परत येत आहे. माझे तिकीट बूक करून द्यावे. हे सर्व घडण्याआधीच माझ्या विमानाचे तिकीट बुक झाले होते. आपणास विनंती आहे की अशा गोष्टी पसरवू नका. माझे दिवस चांगले नाहीत आणि अशावेळी मला साथ द्या.”,





