दहशतवाद विरोधी पथकाने आवळल्या सहा जणांच्या मुसक्या; ३ बंदुका, ३६ जिवंत काडतुसे जप्त
Updated On:

Anti-terrorist squad – दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई युनिटने शहरातील बोरिवली परिसरातून सहा जणांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत.
यांच्याकडून ३ बंदुका आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हेगारांना शस्त्रे विकण्यासाठी ही टोळी मुंबईत आली होती अशी माहिती आहे. त्यांचे अन्यत्र कोठे लागेबांधे आहेत याची माहिती घेतली जात आहे.
महाराष्ट्रात अन्य राज्यांतून बेकायदेशीरपणे शस्त्रसाठे विक्रीसाठी आणली जातात. त्यांच्यावर एटीएस अधिकारी आणि पोलिसांचे बारीक लक्ष असते. अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे मात्र अजून समजू शकलेली नाहीत.





