Anti Drug Day: व्यसनमुक्तीचा अनोखा संदेश! पोलिसांच्या उपस्थितीत पार पडली भव्य रॅली
Anti Drug Day: जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आणि स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचा स्तुत्य उपक्रम; 'स्माईल सायक्लोथॉन' उत्साहात संपन्न.

Anti Drug Day – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आणि अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा व स्माइल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व आर्या टिपर आणि टेक्नोवेस पेण्ट्स यांच्या सहकार्याने स्माइल सायक्लोथॉन संपन्न झाली. या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, कपिलेश इगवे,
आर्या टिपरचे संचालक दिपक फल्ले, स्माइलचे संस्थापक हर्षल पंडित, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आयर्न मॅन सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे व अतुल शेटे अपस्थित होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन प्रविण मोरे व महेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी स्माइलचे प्रशांत टोणगे यांनी वॉर्मअप झुंबा डान्स घेतला.
या रॅलीत पोलीस बांधव, नागरिकांसह १५० सायकलस्वार सहभागी झाले होते. या रॅली मधे सर्वात जेष्ठ सायकलस्वार साठे वय ७५ वर्षे, अलुलकर वय 76 वर्ष तसेच सर्वात छोटा सायकलस्वार चिन्मय कुलकर्णी व श्रावस्ती पंडीत हे प्रमुख आकर्षण ठरले. व्यसनमुक्तीपर विविध घोषणा देत अत्यंत उत्साहात स्माईल व्यसनमुक्ती केंद्र उर्से येथे या रॅलीची सांगता झाली.
सर्व सहभागी सायकलस्वारांना टी शर्ट, प्रशस्तीपत्रक व मेडल देण्यात आले. तसेच प्रथम दहा सायकलस्वारांस विशेष भेटवस्तू देण्यात आली. समारोप कार्यक्रमात स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित यांनी प्रास्ताविक केले, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, अतुल शेटे व राम गोमारे अशा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन दिपक फल्ले यांनी केले. स्माइलचे अमोल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल बोरुडे, अमोल कुलकर्णी, रोहन यादव,हर्षल जोशी, प्रकाश धीडे, राहुल केळकर,अनिल सावंत, जयंत खेर्डेकर, अनंद भागवत, अमेय कुलकर्णी, अमित पाटील यांचे सहकार्य लाभले.





