काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी स्थापन होणार नाही, पण… संजय राऊत म्हणाले…

काँग्रेसशिवाय कोणतीही राजकीय आघाडी करणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे. मात्र, या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व केसीआर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, शिवसेना हा पहिला पक्ष आहे ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची चर्चा केली होती. ते माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
We never said that a political front will be formed without Congress. At the time when Mamata Banerjee had suggested a political front,ShivSena was the first political party that talked about taking Congress along. KCR has the ability to lead by taking everyone along: Sanjay Raut pic.twitter.com/nNGxb1VtVu
— ANI (@ANI) February 21, 2022
संजय राऊत म्हणाले की, ‘काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. ज्या वेळी ममता बॅनर्जींनी राजकीय आघाडी सुचवली. त्यावेळी शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची चर्चा केली होती. केसीआरमध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे. असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चा रंगू लागलेल्या असतानाच काँग्रेसशिवाय बिगर भाजपा पक्षांची आघाडी यशस्वी होऊ शकत नाही याची आठवण काँग्रेसने करून दिली. याच सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.





