लखनौ – उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (सुभासप) शुक्रवारी राष्ट्रपती निवडणुकीतील “एनडीए”च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. तसा निर्णय घेणारा “सुभासप” हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएबाहेरील आणखी एक पक्ष ठरला आहे.
“सुभासप”च्या पाऊलामुळे समाजवादी पक्षाच्या (सप) नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशातील विरोधकांच्या आघाडीला तडे गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक “सुभासप”ने “सप”च्या नेतृत्वाखालील आघाडीचा घटक बनून लढवली. त्या निवडणुकीत बाजी मारून भाजपने उत्तर प्रदेशची सत्ता राखली.
पराभवानंतर विरोधकांच्या आघाडीत आणि विशेषत: सप, सुभासपमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे अनेकदा दिसून आले. आता राष्ट्रपती निवडणुकीसाठी वेगवेगळ्या दिशांना तोंड केल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध आणखीच ताणले गेल्याचे सूचित होत आहे.
खासदार सिमरनजित सिंग मान यांचे भगतसिंग यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान
सपने विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. सुभासपने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने तो पक्ष भाजपच्या जवळ जाऊ लागल्याचे मानले जात आहे. सुभासपचे उत्तर प्रदेशात 6 आमदार आहेत.
गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण