संगरूर – संगरूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत नुकतेच विजयी झालेले शिरोमणी अकाली दलाचे खासदार सिमरनजित सिंग मान यांनी थोर क्रांतीकारक भगतसिंग यांच्याबाबत एक आक्षेपार्ह विधान केल्यामुळे नवा वाद पेटणार आहे.
मान यांनी भगतसिंग यांचा उल्लेख चक्क दहशतवादी असा करून स्वत:ला आणि पक्षाला अडचणीत आणले आहे. भगतसिंग यांनी नॅशनल असेंब्लीत बॉम्ब फेकला होता, तसेच ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या केली आदी भारताच्या इतिहासातील गौरवशाली घटनांचाही मान यांनी उल्लेख केला आहे.
गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण
दरम्यान, मान यांचे वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आणि अपमानास्पद असल्याची टीका आम आदमी पक्षाच्या पंजाब शाखेने केली आहे. आपल्या विधानांबद्दल मान यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, भगतसिंग देशासाठी ब्रिटीशांशी लढले याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आल्यावर हा तुमचा दृष्टीकोन आहे, अशी अमान्य होणारी टीप्पणीही मान यांनी केली.
चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी अमेरिकेचे भारताला बळ; एस-400 क्षेपणास्त्र खरेदीचा मार्ग मोकळा