ट्रम्प सरकारचा आणखी झटका! अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली; शीख आणि मुस्लिम सैनिकांची नाराजी

US Army Beard Ban | अमेरिकन लष्करातील शीख सैनिकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने काढलेल्या एका नव्या आदेशामुळे चिंता वाढली आहे. अमेरिकन संरक्षणमंत्री पीट हॅगसेथ यांनी नुकताच एक निर्णय घेतला. अलिकडेच जारी केलेल्या मेमोमध्ये लष्करी दाढी सवलती रद्द केल्या असून, धार्मिक कारणास्तव दाढी ठेवणाऱ्या सैनिकांच्या सेवेला धोका निर्माण होऊ शकतो.
नवीन धोरणानुसार २०१० पूर्वीच्या कडक ग्रूमिंग नियमांकडे परत जाण्याची तरतूद आहे. ३० सप्टेंबर रोजी मरीन कॉर्प्स बेस क्वांटिको येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना, हेगसेथ यांनी दाढीसारख्या वैयक्तिक अभिव्यक्ती बंद करण्याची घोषणा केली. पेंटागॉनने तातडीने सर्व लष्करी शाखांना आदेश दिला की, बहुतेकांनी दाढी ६० दिवसांत काढाव्या, फक्त विशेष दलातील कर्मचाऱ्यांसाठी सूट राहणार.
दुसरीकडे पेंटागॉनने एक मेमो जारी केला. यामध्ये सर्व लष्करी शाखांना २०१० पूर्वीच्या मानकांवर परत जाण्याचा आदेश देण्यात आला. म्हणजेच, दाढी ठेवण्याची परवानगी पूर्णपणे रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे शीख, ऑर्थोडॉक्स ज्यू आणि मुस्लिम सैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कोणाला असणार तात्पुरती सूट?
शीख कोएलिशनने पीट हॅगसेथ यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. नवीन आदेशात म्हटलं आहे की, ‘चेहऱ्यावरील केसांना साधारणपणे परवानगी दिली जाणार नाही’ आणि सर्व युनिट्सना 60 दिवसांत योजना तयार करावी लागेल आणि 90 दिवसांत ती पूर्णपणे लागू करावी लागेल. फक्त स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसना तात्पुरती सूट मिळू शकते, परंतु मिशनपूर्वी क्लीन-शेव्ह होणे बंधनकारक असेल. याशिवाय लष्करातील जास्त वजन असलेल्या जनरल्सनाही त्यांचं वजन कमी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शीख, ऑर्थोडॉक्स ज्यू आणि मुस्लिम सैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक सैनिक, ज्यांना आतापर्यंत दाढी आणि पगडी ठेवण्याची परवानगी होती, त्यांना भीती आहे की आता त्यांना त्यांच्या धर्म आणि करिअर यापैकी एकाची निवड करावी लागेल. शीख कोलिशनने या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
या नवीन नियमामुळे मुस्लिम आणि ऑर्थोडॉक्स ज्यू सैनिकांनाही दाढी ठेवण्यास अडथळा येऊ शकतो. अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स कौन्सिल (CAIR) ने संरक्षण सचिवांना पत्र लिहून या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. अमेरिकन संरक्षणमंत्र्यांचं म्हणणं आहे की, दाढीमुळे गॅस मास्कचा योग्य वापर करण्यात अडथळा येतो आणि युनिटमध्ये एकसमानता राखण्यासाठी हे आवश्यक आहे. US Army Beard Ban |
अमेरिकन लष्करातील शीखांचा इतिहास
अमेरिकन लष्करात शीखांचा इतिहास मोठा आहे. पहिल्या महायुद्धातही ते अमेरिकन लष्करात होते. भगत सिंह थिंड हे 1917 मध्ये अमेरिकन लष्करात दाखल झालेले पहिले प्रसिद्ध शीख होते, ज्यांना पगडी घालण्याची परवानगी मिळाली होती. मात्र हा एक अपवाद होता.
1980 च्या दशकात कठोर नियमांमुळे दाढी आणि पगडीवर बंदी घालण्यात आली होती. 2010 मध्ये परिस्थिती बदलली. दोन शीख अधिकाऱ्यांना, कॅप्टन सिमरनप्रीत सिंह लांबा आणि डॉ. मेजर कमलजीत सिंह कलसी यांना धार्मिक सूट देण्यात आली. यामुळे एक पायंडा पडला आणि 2017 मध्ये दाढी, पगडी आणि इतर धार्मिक चिन्हांना परवानगी देण्यात आली होती. US Army Beard Ban |
हेही वाचा:
प्रवरा अर्बनच्या चेअरमनपदी डॉ. करणसिंह घुले तर व्हाईस चेअरमनपदी सतिष गायके यांची बिनविरोध निवड





