प्रवरा अर्बनच्या चेअरमनपदी डॉ. करणसिंह घुले तर व्हाईस चेअरमनपदी सतिष गायके यांची बिनविरोध निवड

नेवासे : नेवासा खुर्द येथील प्रवरा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. या झालेल्या निवड प्रक्रियेत चेअरमनपदी डॉ. करणसिंह घुले तर व्हाईस चेअरमनपदी सतीश गायके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये विठ्ठल मैंदाड, बापूसाहेब बानकर,फराज शेख,विजय यादव,विशाल पिपंळे,तुषार बेलदार, कैलास, कृष्णा पवार, संदीप वीर, भारत कोकणे ,शोभा जामदार व कल्याणी सावंत यांचा समावेश आहे या सर्व संचालक मंडळाचा कार्यकाळ २०२५ ते २०३० असा ठेवण्यात आलेला आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाय.एल. नरसिंगपुरकर,नेवासा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली संस्थेचे व्यवस्थापक खाटीक अक्षय सुनिल यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.





