पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 167 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 148 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. परंतु मागील तीन मृत्यूंची शुक्रवारी नोंद करण्यात आली.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज शहरात 167 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 67 हजार 930 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील 3 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4385 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 148 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 62 हजार 594 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5341 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 634 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 577 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1211 इतकी आहे.