#IndianFootball : भारतीय फुटबॉल संघाला मिळाला नवा प्रशिक्षक, ‘या’ दिग्गज खेळाडूवर सोपवली जबाबदारी…

Indian Football Team : इंडियन सुपर लीगमध्ये सध्या एफसी गोवाचे प्रभारी असलेले स्पेनचे मॅनोलो मार्केझ यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते बडतर्फ इगोर स्टिमॅकची जागा घेतील. मॅनोलो मार्क्वेझ 2020 पासून इंडिया सुपर लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी हैदराबाद एफसी आणि एफसी गोवा संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.
शनिवारी येथे झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) कार्यकारी समितीच्या बैठकीत 55 वर्षीय मार्केझ यांची सर्वोच्च पदावर नियुक्ती करण्यात आली. दिवसाच्या आपल्या पहिल्या निर्णयात, समितीने वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीवर चर्चा केली आणि तत्काळ प्रभावाने या पदासाठी मनोलो मार्केझची निवड केली. मार्केझ 2024-25 हंगामात एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्या भूमिकेत राहतील. पूर्णवेळ आधारावर राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यापूर्वी तो दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी हाताळणार आहेत, असेही एआयएफएफने निवेदनात म्हटले आहे.
Manolo Marquez appointed head coach of Senior Men’s National Team!
Read full details here 👉🏻 https://t.co/iUUMAwB8vk#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/Ni9beyul8B
— Indian Football Team (@IndianFootball) July 20, 2024
2026 फिफा विश्वकरंडक पात्रता फेरीत भारतीय संघ तिसऱ्या फेरीत प्रवेश करू शकला नाही, म्हणून 17 जून रोजी स्टिमॅक यांची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
मानोलो मार्केझ म्हणाले की, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, ज्या देशाला मी माझे दुसरे घर मानतो. मला भारत आणि तिथल्या लोकांशी जोडले गेलेले वाटते आणि मी पहिल्यांदा या देशामध्ये आलो तेव्हापासून मला या सुंदर देशाचा एक भाग वाटत आहे. मी क्लबचा मुख्य प्रशिक्षक असताना आगामी हंगामात राष्ट्रीय संघाला मदत करण्याची संधी दिल्याबद्दल मी एफसी गोवाचा खूप आभारी आहे. या संधीसाठी मी एआयएफएफचा आभारी आहे.





