सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलर या सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर कहर केला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अशक्षहा डोक्यावर उचलून घेतलं होतं. सिनेमातली रजनीकांतची स्टाईल अनेकांनी कॅापी केल्याचे देखील पाहिला मिळाले. खरंतर रजनीकांत यांचे फॅन भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. त्यांचा नवा सिनेमा कधी येणार याची उत्सुकतेने त्यांचे फॅन्स वाट पाहतात असतात. अशातच जेलर २ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ४ मिनिटांचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामुळे आता जेलर २ कधी येणार याची उत्सुकता लागली आहे.
चार मिनिटांच्या प्रोममध्ये जेलरचे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध नवीन स्क्रीप्टची चर्चा करताना दिसत आहेत. अचानक त्यांच्या घरात गोळीबार आणि तोडफोड होते. त्यानंतर हिरोची अर्थातच रजनीकांची धमाकेदार एन्ट्री होते. ती एन्ट्री पाहून अनेकांना जेलरीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. रजनीकांत यांच्या हातामध्ये बंदूक आणि डोक्यात आग दिसत आहे, अशी डॅशिंग एन्ट्री त्यांची दाखविण्यात आली आहे. जेलर २ ची अधिकृत रिलीज डेट लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
जेलर सिनेमात रजनीकांत यांच्या स्टाईलवर मोठं काम करण्यात आलं होतं. कारण रजनी यांचे त्याअगोदर बऱ्याचशा सिनेमांत त्यांची स्टाईल रिमिट करण्यात आली होती. मात्र, जेलरमधले रजनी हे त्याहून पूर्णपणे वेगळे वाटतात. त्यांची या सिनेमातली स्टाईन त्यांच्या चाहत्यांना आवडली होती. आता जेलर २ मध्ये त्यांच्या काही नवीन स्टाईल्स पाहिला मिळणार का, यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. जेलर २ मध्ये जॅकी श्रॅाफ आणि साउथ सुपरस्टार मोहनलाल झळकणार आहेत.