Rishabh Shetty Post : भारतीय सिनेमा इंडस्ट्रीतील मास्टरपीस सिनेमा ठरलेला कांताराचा प्रीक्वल रिलीजसाठी सज्ज आहे. २ अॅाक्टोबर २०२५ रोजी हा सिनेमा देशभरात रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर आता कांताराचा प्रीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी पावणेएक वाजता प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरची मोठी उत्सकुता आता चाहत्यांना लागली आहे. अशातच या सिनेमाची एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमात बॅालिवूड अभिनेता ऋतिक रोशन दिसणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. याचं कारण म्हणजे या सिनेमाचा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषिकभ शेट्टी याने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर कांतारा सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये अभिनेता ऋतिक रोशन दिसत आहे. या सिनेमाचा हिंदी ट्रेलरही लॅान्च करण्यात येणार आहे. या ट्रेलर लॅान्च सोहळ्याला ऋतिक रोशन हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. याविषयी ऋषभ शेट्टीने पोस्टर शेअर करून माहिती दिली आहे. When the force of nature meets the fire of a Superstar 🔥 The Hindi Trailer of #KantaraChapter1 will be unveiled by the phenomenal @iHrithik Sir. More legends. More languages. The roar of #Kantara will now echo across the world. Stay tuned!#KantaraChapter1Trailer drops on… pic.twitter.com/IGOWv7CmlK — Rishab Shetty (@shetty_rishab) September 20, 2025 काय असणार कथा? अमेरिकेनी तिकीट बुकिंग वेबसाईट फॅनट्यांगोने याबाबात माहिती दिली आहे. कांतारा चॅप्टर १ ची कथा ही २०२२ च्या अगोदर ३०० इसवी सनाच्या काळातली असणार आहे. या सिनेमात कदमवंश दाखविण्यात आला आहे. सिनेमाची कथा बनवासीच्या रहस्यमय जंगलात घेऊन जाणारी असणार आहे. या जंगलात दिव्य शक्ती असून येथे देव परंपराची पूजा दाखवण्यात येणार आहे, अशी थोडक्यात कथा असणार आहे. ऋषभ शेट्टी नागा साधूच्या भूमिकेत कांतारा चॅप्टर १ सिनेमाचा ट्रेलर येणे बाकी असले तरी सिनेमाचं पोस्टर आणि टीझरने अभिनेता आणि या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या भूमिकेची झलक दाखविण्यात आली. आता या सिनेमात त्याचा रोल काय असणार याविषयी माहिती समोर आली आहे. तो या सिनेमात एका नागा साधूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमाची सुरूवात दंतकथेपासून होणार आहे. सिनेमातील अॅक्शन सीनसाठीही प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. अॅक्शन सीनसाठी रॅगिग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हेही वाचा : नवरात्रोत्सवातील गरब्यामध्ये मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, आधारकार्ड तपासा आणि…; विश्व हिंदू परिषदेची ठाम भूमिका