‘अंकिता तुझा एक्स बॉयफ्रेंड पैसे देत नाही…’; झोमॅटोचे ‘ते’ ट्विट चर्चेत, नेटकरी म्हणतात….

मुंबई – ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो नेहमीच चर्चेत राहिले आहे. अनेकदा झोमॅटो वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहे. मात्र सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या हे झोमॅटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे एका ट्वीटमुळे… झोमॅटोने भोपाळमध्ये राहणाऱ्या ‘अंकिता’ला उद्देशून हे ट्वीट केले आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
झोमॅटोने अंकिताला एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरीवर फूड पाठवणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. याचे मजेशीर कारण वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. झोमॅटोने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये लिहिले आहे, “भोपाळमधील अंकिता कृपया तुमच्या जुन्या प्रियकराला कॅश ऑन डिलिव्हरीवर जेवण पाठवणे बंद करा, ही तिसरी वेळ आहे, तो पैसे देण्यास नकार देत आहे!”
Ankita from Bhopal please stop sending food to your ex on cash on delivery. This is the 3rd time – he is refusing to pay!
— zomato (@zomato) August 2, 2023
झोमॅटोच्या ट्वीटनुसार, ‘अंकिता’ तिच्या एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरी मोडवर सतत फूड पाठवत होती. म्हणजे या ऑर्डरचे पैसे अंकिताच्या एक्स बॉयफ्रेंडने देणे अपेक्षित आहे. पण अंकिताचे एक्स बॉयफ्रेंड ऑर्डरचे पैसे देण्यास नकार देत होता. हे एक-दोनदा नाही तर तीन वेळा घडले. त्यामुळे झोमॅटोने देखील थेट ट्वीट करत अंकिताला विनंती केली. झोमॅटोच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून यावर नेटकरी देखील मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.





