अंकिता लोखंडेचा हिजाबमधील व्हिडीओ व्हायरल; चाहते संतापले

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. मालिकांसह तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. विमानतळावर पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये अंकिता सुंदर दिसत आहे. पण तिने घातलेल्या हिजाबने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्रीने हा लूक अगदी सहजतेने कॅरी केला. पण तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या हिजाबचे कौतुक केले तर काहींनी अंकिता लोखंडेला ट्रोल केले आहे. Ankita Lokhande |
View this post on Instagram
अंकिताच्या व्हिडीओवर कमेंट करत एक चाहता म्हणाला, ‘बुद्धी भ्रष्ट झाली आहे हिची…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पागल औरत…’ अनेक सोशल मीडिया यूजर अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. Ankita Lokhande |
अंकिताबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ मध्ये ती पतीसोबत पाहायला मिळाली. छोट्या पडद्याव्यतिरिक्त अंकिता ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ (2019), ‘बागी 3’ (2020), ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. अंकिता रणदीप हुड्डासोबत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये दिसली होती. लवकरच ती आगामी वेब सीरिज ‘आम्रपाली’मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:
इंन्टाग्रामवर मैत्री अन्…; अल्पवयीन मुलाने मौज-मजा करण्यासाठी चोरले आजीचे दागिने





