Anju Krishna : मनोरंजन विश्वात मोठी खळबळ.! ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री सह ७ जणांना अटक
या प्रकरणात नाव येण्यापूर्वी अंजू कृष्णाला तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतील अभिनयासाठी ओळखले जात होते.

Anju Krishna – तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अंजू कृष्णा हिला चेन्नईमध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अँटी-नार्कोटिक्स इंटेलिजन्स युनिट (ANIU) च्या साऊथ टीमने वलसरवक्कम परिसरात छापा टाकत ही कारवाई केली.
या कारवाईत अंजू कृष्णासह (Anju Krishna) एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ ग्रॅम मेथामफेटामाइन, ७ ग्रॅम गांजा, १५ ग्रॅम भांग, एक LSD स्टॅम्प आणि ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
अटक झालेल्यांमध्ये असिस्टंट डायरेक्टर विन्सी निवेधा, कार्तिक राजा, यशवंत, श्रीराम, अल्विबिनशा आणि व्यंकटेश कुमार यांचा समावेश आहे. सध्या सर्वांची चौकशी सुरू असून पुढील तपास ANIU करत आहे.
अंजू कृष्णाची फिल्मी कारकीर्द !
या प्रकरणात नाव येण्यापूर्वी अंजू कृष्णाला तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतील अभिनयासाठी ओळखले जात होते. ३१ वर्षीय अंजूने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. IMDb नुसार, तिने ‘आकाशम कडन्न’, ‘आरो’ आणि ‘ओम वेल्लिमालई’ सारख्या चित्रपटांत अभिनय केला.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओम वेल्लिमालई’ हा चित्रपट ओम विजय यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये सुपरगुड सुब्रमणी आणि वीरा सुभाष मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्रीचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
अंजू कृष्णाच्या अटकेनंतर चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काही जणांनी दोषारोप केले आहेत तर काहींनी न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीतील ड्रग्जविषयक चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
हे देखील वाचा :
MPC meeting: बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी RBIचा मोठा निर्णय; फसवणूक आणि ‘मिस-सेलिंग’ला बसणार लगाम






