Animal : रणबीरच्या ‘अॅनिमल’चा टिझर झळकला बुर्ज खलिफावर; व्हिडिओ व्हायरल….

Animal Movie : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ‘तू झुठी मैं मक्कर’ नंतर संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. चित्रपट निर्मात्यांनी या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज केला आहे. चित्रपटाचा प्री-टीझर पाहता रणबीर ‘अॅनिमल’मध्ये दमदार अॅक्शन करताना दिसत आहे.
View this post on Instagram
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, भूषण कुमार निर्मित ‘अॅनिमल’ हा चित्रपट एक उत्कृष्ट कथा आहे. ज्यामध्ये रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी सारखे स्टार कलाकार देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, सिनेमाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे. आता हा टिझर दुबईच्या सुप्रसिद्ध ‘बुर्ज खलिफा’वर देखील झळकला आहे. काही दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘पठान’ हा चित्रपटाचा टिझर दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला होता.
यानंतर आता रणबीरचा आगामी ‘ॲनिमल’चित्रपटाचा टिझर सुप्रसिद्ध जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर म्हणजे, बुर्ज खलिफावर दाखविण्यात आला. यामुळे चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला. या सोहळ्यादरम्यान रणबीरसोबत चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे बॉबी देओलही उपस्थिती लावली होती. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.





