Animal Smuggling | चाकणमध्ये जनावरांची बेकायदेशीर वाहतूक उघड ; चार आरोपी अटकेत

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – चाकण शिक्रापूर रोडवर दोन वाहनांमधून जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करताना चौघांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २०) दुपारी मेदनकरवाडी फाटा, खेड येथे करण्यात आली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बजरंग दरेकर यांनी शनिवारी (दि. २०) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप संदीपान सोनवणे (वय २५, रा. भाट सांगवी, जि. बीड), रोहित सुभाष म्हस्के (वय २२, रा. भाट सांगवी, जि. बीड), मसुराम जिजाभाऊ परसकर (वय २५, रा. उंब्रज खालसा, जि. बीड),
आणि बबन आश्रुबा परभाळे (वय ४५, रा. उंब्रज खालसा, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन वाहनांमधून नऊ जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक केली. याबाबत चाकण पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत नऊ जनावरांची सुटका केली आहे. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





