“काही लोक समांतर भाजप चालवत आहेत…” ; हरियाणाचे मंत्री अनिल विज यांचा स्फोटक दावा

Anil Vij। हरियाणाचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल विज यांनी पुन्हा एकदा राज्यातील पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनीआज सोशल मीडियावर पोस्ट करताना, “काही लोक अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये समांतर भाजप चालवत आहेत, ज्यांना वरील लोकांचे आशीर्वाद देखील आहेत. कमेंट बॉक्समध्ये लिहा की आपण काय करावे? पक्षाचे खूप नुकसान होत आहे.”असे म्हणत खळबळजनक विधान केले आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऊर्जा आणि वाहतूक मंत्री अनिल विज यांनी दावा केला होता की, ऑक्टोबर २०२४ मध्ये अंबाला कॅन्ट मतदारसंघातून त्यांना पराभूत करण्यासाठी कट रचण्यात आला होता. त्यांनी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना लक्ष्य केले होते.
आशिष तायल यांचा उल्लेख Anil Vij।
हरियाणा सरकारमधील वाहतूक मंत्री अनिल विज यांनी,”मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मित्रासोबत दिसणारे कामगार भाजपविरोधी उमेदवार चित्रा सरवारासोबत देखील दिसतात. या नात्याला काय म्हणतात” असा सवाल त्यांनी केला होता. पुढे ते म्हणाले, “स्वतःला नायब सैनी यांचे मित्र म्हणवणारे आशिष तायल यांचे फेसबुकवर नायब सैनीसोबतचे अनेक फोटो आहेत.” तायल अजूनही नायब सैनी यांचे जवळचे मित्र आहेत, मग प्रश्न असा पडतो की भाजप उमेदवाराला कोणी विरोध केला?”
२०२४ च्या निवडणुकीत अनिल विज यांना अपक्ष उमेदवार चित्रा सरवारा यांनी कडक आव्हान दिले. विज यांना ५९,८५८ मते मिळाली. सरवारा यांना ५२,५८१ मते मिळाली. काँग्रेस उमेदवाराला १४,४६९ नोटा मिळाल्या. २०१९ मध्ये अनिल विज यांना ६४,५७१ मते मिळाली. या निवडणुकीतही माजी काँग्रेस नेते सरवारा यांना ४४,४०६ मते मिळाली. अंबाला कॅन्टोन्मेंटमधून सात वेळा आमदार राहिलेले अनिल विज यांनी फेब्रुवारीमध्ये, “पदभार स्वीकारल्यापासून ते (सैनी) ‘उडान खटोला’ (हेलिकॉप्टर) चालवत आहेत. जर ते खाली आले तर त्यांना जनतेचे दुःख कळेल.” म्हटले होते.
भाजपने नोटीस दिली होती Anil Vij।
या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीसही दिली होती. विज यांनी यावर उत्तरही पाठवले होते. त्या नोटीसबाबत अनिल विज यांनी त्यावेळी म्हटले होते की, “मी वादळांसोबत खेळतो, मी स्वतः वादळ आहे, माझ्याशी टक्कर घेणाऱ्यांसाठी मी त्यांच्या अंताचा संदेश आहे. “मात्र, नंतर प्रकरण शांत झाले. आता पुन्हा एकदा अनिल विज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता अनिल विज यांना नुकसान पोहोचवणारा तो भाजप नेता कोण आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल.





